Skip to main content

पसारा

श्रीराम

७. पसारा

मना!
*करू नको रे पसारा*
आवरता यायला हवा
निरोप आल्या आल्या
*देह सोडायला हवा...!*

मना!
भाड्याचाच देह
भाड्याचेच घर
करार समाप्ती होता
*देह सोडायला हवा...!*

मना!
अनुग्रह घेतला तेव्हा
देह सद्गुरुंना दिधला
त्यांची आज्ञा होता
*देह सोडायला हवा...!*

मना!

नाम घेता घेता
जीव नामरूप झाला
सद्गुरुचरणी लीन होता
*देह सोडायला हवा..!*

मना!!
*नको करू  रे पसारा*
आवरता यायला हवा
निरोप आल्या आल्या
*देह सोडायला हवा...!*

श्रीराम

संदीप रामचंद्र सुंकले
थळ अलिबाग
८३८००१९६७६



पसारा


किती करशील पसारा..?

आज्जी आपल्या नातवाला सांगत होती...
पण मुलंच ती... एक खेळणं घेऊन खेळली तर त्यांना मुलं कोण म्हणणार..?

आज्जीला तिचं बालपण आठवलं, सोंगट्या, लाकडाची बाहुली आणि असेच काही खेळ...!

सुमा, गंगा, सरस्वती, मैना, सुरेखा.... कितीजणी असायच्या, आम्ही घरातल्या चारपाच जणी आणि शेजारच्या, खूप मज्जा यायची, पावसात तर पुष्करणीत पोहायला ही जायचो....!

पण आता संध्याकाळ दिसू लागली...!

पान परिपक्व होत चाललं...!

परतीचा प्रवास सुरु झालाच आहे.....

काही मैत्रिणी गेल्या अंतिम यात्रेला...

सकाळी सकाळी असे अभद्र विचार का येत आहेत मनात ?

पण हे अभद्र ? असे कसे असेल ?
मृत्यू जर सत्य असेल तर हा विचार ही सत्य च नव्हे काय ?

आपलं मन दोन्हीबाजूनी बोलतं, त्याला काय जातंय बोलायला, त्याला मरण नाही...
मरण देहाला आहे, देह सोडून जायचेच आहे.....
काल प्रवचनात सद्गुरू असेच काही सांगत होते,  तितकंसं आकळलं नाही, पण मनात विचार नक्कीच सुरू झाला आहे....

लहानपणी भातुकली खेळताना जरी बाहुलीचं लग्न लागत असेल आणि आईने बोलावलं तर आपण तत्काळ लग्नमंडप सोडून घरी यायचो, नाही का ..?

तशी तयारी करायला हवी...(अर्थात मनाची....!)

नामस्मरण आणि सद्गुरुकृपा यामुळे हे मला नक्कीच जमेल.....!

एक मात्र खरं...!

पसारा आवरायला हवा....!
 किंवा....
आपण त्यातून अलिप्त व्हायला हवे.....

नाही का ?


श्रीराम

संदीप रामचंद्र सुंकले
थळ,अलिबाग
८३८००१९६७६

Comments

  1. कल्पना उत्तम आहे ब्लॉगच्या माध्यमातून आपल्या हातून असेच आकर्षक लेखन होत राहो

    यातूनच पुढे एखादे विचार प्रवर्तक पुस्तक तयार होईल

    शुभेच्छा

    ReplyDelete
  2. खूप छान लेख ! .... आपले विविध विषयांवरील लिखाण वाचनात असते . Blog मुळे आता सर्व लेखन एकत्रित ऊपलब्ध होईल ही अपेक्षा !

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

श्रीराम २०.११.२०१९ *मी* मुग्ध मी की मुक्त मी? आदि मी ? अनादी मी? व्यक्त मी? अव्यक्त मी? मजलाच कळेना मी ? धुंद मी की बेधुंद मी? लिप्त मी ? अलिप्त मी ? मस्त मी?  मदमस्त मी ? मजलाच कळेना मी ? मित्र मी की  शत्रू मी ? घोरी मी? अघोरी मी ? शांत मी ? अशांत मी ? मजलाच कळेना मी ? किती शोधला 'मी'ला मी? किती सांगू 'मी' बद्दल मी? रामनाम स्मरण करता मी,  विसरून गेला  मी ला मी. श्रीराम दासचैतन्य
श्रीराम २०.११.२०१९ कार्यकर्ता ९ समाजाचा खरा नेता, योग्यता आणि क्षमता असूनही समाजापासून जास्त पुढे राहू शकत नाही. तो एवढेच अंतर ठेवतो की समाजाला वाटते की आपण याची बरोबरी करू शकू.  आम्हाला नेहमीच असे वाटे की डॉक्टर आमच्यापासून फक्त दोनच पाऊले पुढे आहेत. आम्ही त्यांच्या सोबत येण्यासाठी आमचा वेग वाढवत होतो व त्या स्थानावर पोचल्यावर आमच्या लक्षात यायचे की डॉक्टर आणखी दोनच पाऊले पुढे आहेत.  मा.दत्तोपंत यासाठी माऊलींची पुढील ओवी प्रस्तुत करतात. "मार्गाधारे वर्तावे। विश्व मोहरे लावावे। अलौकिक नोहावे। लोकांप्रती।।" श्रीराम संदर्भ :- 'कार्यकर्ता' (भारतीय विचार साधना पुणे प्रकाशन)