श्रीराम २०.११.२०१९ *मी* मुग्ध मी की मुक्त मी? आदि मी ? अनादी मी? व्यक्त मी? अव्यक्त मी? मजलाच कळेना मी ? धुंद मी की बेधुंद मी? लिप्त मी ? अलिप्त मी ? मस्त मी? मदमस्त मी ? मजलाच कळेना मी ? मित्र मी की शत्रू मी ? घोरी मी? अघोरी मी ? शांत मी ? अशांत मी ? मजलाच कळेना मी ? किती शोधला 'मी'ला मी? किती सांगू 'मी' बद्दल मी? रामनाम स्मरण करता मी, विसरून गेला मी ला मी. श्रीराम दासचैतन्य
श्रीराम २०.११.२०१९ कार्यकर्ता ९ समाजाचा खरा नेता, योग्यता आणि क्षमता असूनही समाजापासून जास्त पुढे राहू शकत नाही. तो एवढेच अंतर ठेवतो की समाजाला वाटते की आपण याची बरोबरी करू शकू. आम्हाला नेहमीच असे वाटे की डॉक्टर आमच्यापासून फक्त दोनच पाऊले पुढे आहेत. आम्ही त्यांच्या सोबत येण्यासाठी आमचा वेग वाढवत होतो व त्या स्थानावर पोचल्यावर आमच्या लक्षात यायचे की डॉक्टर आणखी दोनच पाऊले पुढे आहेत. मा.दत्तोपंत यासाठी माऊलींची पुढील ओवी प्रस्तुत करतात. "मार्गाधारे वर्तावे। विश्व मोहरे लावावे। अलौकिक नोहावे। लोकांप्रती।।" श्रीराम संदर्भ :- 'कार्यकर्ता' (भारतीय विचार साधना पुणे प्रकाशन)